सेल्फी काढण्याच्या नादात तीन विद्यार्थी कालव्यात बुडाले. ही दुर्दैवी घटना बंगळूरपासून १८० किलोमीटरवर हुलीवना गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली.
हे सर्व विद्यार्थी बंगळूर येथील मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे विद्यार्थी होते. यातील दोघांचे मृतदेह सापडले आहे असून तिसर्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे अंतिम वर्षांचे श्रुती, जीवन, गिरीश, गौतम पटेल व सिंधू असे एकूण पाच विद्यार्थी या गावातल्या कालव्याजवळ सहलीसाठी गेले होते.
यावेळी पाण्यात खेळत असताना आणि सेल्फी काढण्याच्या नादात त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. सेल्फी काढता काढता हे सर्व विद्यार्थी २० फूट खोली असलेल्या कालव्यात पडले.
विद्यार्थ्यांच्या आरडा ओरडामुळे स्थानिक त्यांच्या मदतीला धावून गेले. गौतम व सिंधूला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. परंतु अन्य तिघांना ते वाचवू शकले नाहीत. यात श्रृती, जीवन आणि गिरीष या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.