इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के

इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के

इंडोनेशियाच्या पूर्व किनारपट्टीजवळ ६.५ रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे तीव्र धक्के बसले. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हे धक्के जाणवले. तसेच यामध्ये जीवित, वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पूर्व किनारपट्टीपासून तीन किलोमीटर आत व ३० किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू असून अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

याआधी १२ जानेवारीला इंडोनेशियामध्ये तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला असून ६.९ रिश्टर स्केल क्षमतेचा हा धक्का होता. पूर्व इंडोनेशियातील मलुकु बेट येथून ३३० किलोमीटर आत आणि १०२ किमी खोल भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *