दक्षिण जर्मनमध्ये दोन रेल्वेची धडक होईन भीषण अपघात झाला. यामध्ये चारजण ठार झाले तर १०० जण गंभीर जखमी आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
बवारिया येथील बाद अईब्लिंग शहराजवळ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन रेल्वे एकमेंकासमोर आल्या आणि त्यांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला.
घटनास्थळी बचाव पथकाचे जवान, पोलीस तर रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर अन्य मृतदेहचा शोध सुरू आहे. झालेल्या भीषण अपघातात मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १०० जण जखमी असून त्यापैकी ५५ जण गंभीर जखमी आहेत.
या दोन्ही गाड्या रुळावरून बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.