भारतीय शेंगदाण्यावरील आयातबंदी व्हिएतनामने उठवली

भारतीय शेंगदाण्यावरील आयातबंदी व्हिएतनामने उठवली

व्हिएतनामने भारतीय शेंगदाण्यावरील आयातबंदी औपचारिकपणे उठवली आहे. ९ महिन्यांनंतर भारतीय शेंगदाण्याला तेथील बाजारपेठेत प्रवेश मिळेल, असे कृषी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले.

६ एप्रिल २०१५ पासून व्हिएतनामने भारतातून शेंगदाणा आयातीवर बंदी घातली होती. व्हिएतनामी कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाने औपचारिकरीत्या हा निर्णय भारत सरकारला कळवला आहे. तेथील रोप संरक्षण विभाग आयातीला परवानगी जारी करेल, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

व्हिएतनामी शिष्टमंडळाने डिसेंबरमध्ये भारतात दौरा केला असून भारतातील धुरी देण्याची सुविधा, निर्यात प्रक्रिया आणि निर्यात प्रमाणपत्र व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर बंदी उठवण्याचा निर्णय झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी भारताने व्हिएटनामला सर्व तांत्रिक माहिती पुरवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *