हिमस्खलनातील अडकलेल्या १० जवानांचा मृत्यू

सियाचीनमध्ये हिमकडा कोसळून यामध्ये बेपत्ता झालेल्या सैन्य दलाच्या दहा जवानांचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री हे जाहीर करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले मात्र ते फोल ठरले.

जवानांना वाचवण्यासाठी मागील ४० तासांपासून सियाचीनमध्ये युद्धापातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु होते. या भागात हिमकडा कोसळल्याने बचावकार्यास अडथळे येत होते. मात्र अशा परिस्थितीतही हवाई दल आणि लष्कराकडून प्रय़त्न सुरू होते. पण हे सर्व प्रयत्न फोल ठरले.

बुधवारी सकाळी हिमकडा कोसळून सैन्य दलाच्या दहा जवानांसह एक अधिकारी ढिगा-याखाली सापडल्याची घटना सियाचीन ग्लॅशियर पोस्ट भागात घडली होती. समुद्र सपाटीपासून सुमारे १९००० फूट उंचीवर सियाचीन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम सुरू असतांना हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *