बोको हराम दहशवाद्यांचा हल्ल्यात ८६ ठार

बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी नायजेरीयामध्ये एका गावात केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ८६ जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला केला.

नायजेरियातील मेडूगुरी येथील डालोरी गावावर आणि जवळ असलेल्या २५ हजार शरणार्थींच्या दोन तळावर दहशतवादी हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले.

दहशतवाद्यांनी अनेक घरांना आग लावली. तर गावातील नागरिकांना गोळ्या झाडल्या आणि लहान मुलांना पेटवून दिले, अशी माहिती हल्ल्यातून बचावलेल्या नागरीकांनी दिली.

बोको हराम या दहशतवादी संघटनेने याआधी अनेकदा नायजेरियावर हल्ले केले आहेत. यामध्ये अनेक नागरिक ठार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *