मुंबईतील विलेपार्ले येथे पार्ले टिळक शाळेच्या पटांगणात शुक्रवारी जाणता राजा नाटकाचा प्रयोग सुरु असताना रंगमंचावरील बुरुज कोसळला. या अपघातात तीन कलाकार जखमी झाले. जखमींना त्वरीत पार्ल्यातील बाबासाहेब गावडे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे शिव राज्याभिषेक सोहळा सुरु असताना हा अपघात घडला.
या नाटकामध्ये ३०० हून अधिक कलाकार काम करतात