मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दुपारी ब्लॉक, दरडदुरुस्तीचे काम

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दुपारी ब्लॉक, दरडदुरुस्तीचे काम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ असलेल्या अमृतांजन पुलाजवळील दरडी काढण्याचं काम
केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी दर 15 मिनिटांनी ब्लॉक घेतला जाणार आहे.
दुपारी 12 ते 4 दरम्यान बोरघाटात हा ब्लॉक असेल. बारा ते सव्वा बारा, त्यानंतर एक ते सव्वा, दोन ते अडीच आणि त्यानंतर तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक असेल. अमृतांजन ब्रिज ते खंडाळा दरम्यानची वाहतूक काही काळ बंद राहणार आहे.
ब्लॉकमुळे या मार्गावरची वाहतूक खालापूर टोलनाक्यापासून जुन्या मुंबई पुणे हायवेवर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस प्रवाशांनी एक्सप्रेस वे वर प्रवास करणं टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
दरडी कोसळल्यामुळे पावसाळ्यात मोठे अपघात घडले होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दरडदुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. आता पुन्हा धोकादायक दरडी काढण्याचं काम केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *