चुकीची स्पेलिंग लिहील्याने पोलिसांनी केली चौकशी

लंडन : ब्रिटनमध्ये एका विद्यार्थ्याला इंग्लिश क्लासदरम्यान एका छोट्याशा स्पेलिंगच्या चुकीमुळे पोलिसांच्या चौकशीस सामोरे जावे लागले.

इंग्लिशचा क्लास सुरु असताना या मुलाने मी टेरेसअसलेल्या  (terraced)घरात राहतो असे लिहिण्याऐवजी टेरेरिस्ट (terrorist) हाऊसमध्ये राहत असल्याचे चुकीने लिहिले.

याप्रकरणी त्या मुलाची तसेच त्याच्या घरच्यांची तातडीने चौकशी करण्यात आली. त्या विद्यार्थ्याच्या घरातील कॅम्प्युटरचीही तपासणी कऱण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त करत पोलिसांकडून माफीची मागणी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *