चित्रपटगृहात सापडली बेवारस बॅग

चित्रपटगृहात सापडली बेवारस बॅग

बंगळुरू येथे एका चित्रपटगृहात एक बेवारस बॅग सापडल्याने संपूर्ण चित्रपटगृह रिकामे करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या वेळेस हा प्रकार उघडकीस आला.

बंगळुरूमधील सदाशीवनगर परिसरातील कावेरी चित्रपटगृहात ही बेवारस बॅग सापडली. चित्रपट पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ही बॅग दिसली. याबद्दल त्यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाला कळविले. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या बेवसर बॅगेमध्ये स्फोटक वस्तू असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ या परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

बंगळुरू पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ घटनास्थळावरून प्रेक्षकांना बाहेर काढले. सापडलेल्या बेवारस बॅगेवर अरबी भाषेमधील लिखाण आहे. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे बंगळुरू पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *