इंडोनेशियाची राजधानी जर्कातामध्ये हल्ला झाला असून, गुरुवारी सकाळी जर्काता बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने हादरले. जर्कातामध्ये बॉम्बस्फोटाची मालिका आणि गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
आत्मघातकी हल्लेखोराने एका ठिकाणी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतल्याचे इंडोनेशियन पोलिसांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जर्कातामध्ये एकूण सहा बॉम्बस्फोट झाले असून, रॉयटर्सच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन जण ठार झाले असून शहरामध्ये गोळीबार सुरु आहे. स्टारबक्स कॅफेमध्ये एका बॉम्बस्फोट झाला.