विद्यार्थ्यांना शाळेत नेणा-या शालेय बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन विद्यार्थी ठार झाले तर अन्य ३६ विद्यार्थी जखमी आहे. ही घटना पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी घडली.
गुरुदासपूर जिल्ह्यातील फतेहगड चुरीयन गावातील शालेय बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाल्यावर गावात एका जीपला या बसची किरकोळ धडक झाली. ही बस पुढे निघाली असता एका खड्ड्यात कोसळली. आणि भीषण अपघात झाला.
या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले तर एका विद्यार्थ्याला रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातात ३६ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव पथक तात्काळ दाखल झाले.