सोनिया, राहुल यांच्या जामिनासाठी करंगळी दान

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाल्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याने तिरुपती बालाजी येथे जाऊन आपली करंगळी दान केली आहे.
 
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात या दोघांना जामीन मिळाल्यानंतर डाव्या हाताची करंगळी दान करू, असा नवस सुरेश या कार्यकर्याने केला होता. त्यानुसार, त्याने तिरुपती येथे 25 डिसेंबरला जाऊन आपली करंगळी कापून मंदिराबाहेरील दक्षिणा पेटीत टाकली. यानंतर एका काँग्रेस नेत्याने सुरेश याला आपल्या निवासस्थानी बोलवून तो काँग्रेसचा एकलव्य असल्याचे संबोधले.
 
सुरेशने आपली करंगळी कापल्यानंतर लगेच त्याच्यावर मंदिरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोनिया व राहुल यांना गेल्यावर्षी 19 डिसेंबरला या प्रकरणात जामीन मिळाला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *