मेहबुबा मुफ्ती होणार काश्मीरच्या मुख्यमंत्री

मेहबुबा मुफ्ती होणार काश्मीरच्या मुख्यमंत्री

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून (पीडीपी) स्पष्ट करण्यात आले आहे. मेहबुबा मुफ्ती काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
 
दिल्लीतील आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मुफ्ती महंमद सईद (वय 79) यांचे आज (गुरुवार) सकाळी आजारपणाने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. मुफ्ती यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर त्यांच्या मुलीला बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबुबा मुफ्ती यांचा चार दिवसांनंतर शपथविधी होईल, असे पीडीपी नेत्याने सांगितले आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये पीडीपी-भाजपचे सरकार पहिल्यांदाच जम्मू आणि काश्‍मीरमध्ये सत्तेवर आले. मार्चपासून मुफ्ती हे जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *