बलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला

बलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतरही, पीडीत महिलेची सुटका करण्यात आलेली नाही, तर या महिलेवर बलात्कार केल्यानंतर, हा व्हिडीओ या महिलेच्या भावाला व्हॉटस अॅपने पाठवण्यात आला आहे. ही अंगावर शहारे आणणारी भयानक घटना आहे.

पीडित महिला मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे. माहेरहून सासरी जाण्यास निघालेली ही महिला अजून पोहोचलेली नाही, याबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. कदाचित पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असती तर ही वेळ आली नसती.

या महिलेचा खून झाला असावा, अशी भीती तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे, ही  महिला दलित आहे. दलित संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ व्हॉटस अॅपवरही फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *