केंद्रीय राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात महिलांना लवकरच ३३ टक्के तर सीमा सुरक्षा दल, शस्त्र सुरक्षा दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात १५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
निमलष्करी दलात सध्या ९ लाख सैनिक असून त्यात २० हजार महिला सैनिक आहेत. त्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कान्स्टेबल पदासाठी महिलांना लवकरच ३३ टक्के तर सीमा सुरक्षा दल, शस्त्र सुरक्षा दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात १५ टक्के आरक्षण तात्काळ दिले जाईल. या योजनेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे, असे गृहखात्याने सांगितले.
निमलष्करी दलात महिलांना पुरेसे आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस महिला सबलीकरण समितीने आपल्या अहवालात केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.