पठाणकोट येथील हल्ल्यातील दहशतवद्यांनी पाकिस्तानमधील बहावलपूर येथून तीन दिवसांपूर्वीच भारताच्या सीमेत घुसखोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पठाणकोट येथील लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी आज (शनिवार) पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले तर चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान 11 वाजल्यानंतर पुन्हा गोळीबाराचा आवाज आला असून दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरुच आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक सुरेश अरोडा घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाकिस्तानसोबतचे संबंध चांगले रहावेत यासाठी आमचा प्रयत्न असून आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी “आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ‘ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.