मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसिडेरवरही कारवाई

मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसिडेरवरही कारवाई

नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगीच्या नमुन्यांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट(एमएसजी) आणि शिसेचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यानंतर आता अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरण(एफएसएसएआय) मॅगीचे आणखी काही नमुने तपासणार असल्याची माहिती सोमवारी सरकारने दिली.

या चाचण्यांचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येईल. तसेच जाहिरातीत दिशाभूल केल्याचे आढळल्यास मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसिडेरवरही कारवाई केली जाईल असे सरकारने यावेळी स्पष्ट केले.

एफएसएसआयने सर्व राज्यांतून नमुने गोळा केले आहेत. तपासणी झाली आहे. आज नाहीतर दोन ते तीन दिवसांत याबाबतचे अहवाल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती ग्राहक व्यवहारचे अतिरिक्त सचिव जी. गुरुचरण यांनी सांगितले.

दरम्यान, मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसिडेरवही कारवाई केली जाईल का असे विचारले असता गुरुचरण म्हणाले, जर जाहिरातीत नागरिकांची दिशाभूल केल्याचे आढळले तर नक्कीच मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसिडेरवर कारवाई होऊ शकते.

एफएसएफआयने हे प्रकरण हाती घेतले असून याप्रकरणी ते योग्य कारवाई करतील. याबाबतचे पत्र आम्ही यापूर्वीच एफएसएसआयला लिहिल्याचे खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. दरम्यान मॅगीप्रकरणी कोणतीही तक्रार अद्याप ग्राहक व्यवहार विभागाकडे आली नसल्याचेही ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या खाद्य आणि सुरक्षा विभागाने बाराबंकी येथील स्थानिक न्यायालयात नेस्ले इंडियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित आणि प्रिती झिंटा यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *