कोल्हापूरात सतेज पाटील विजयी

कोल्हापुरातील विधान परिषदेच्या जागेवर कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी ६५ मतांनी विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार महादेव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली.

कॉंग्रेसने विद्यमान आमदार असलेल्या महाडिक यांना कॉंग्रेसने डावलत पाटील यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापुरातील जागेसाठी रविवारी शंभर टक्के मतदान झाले.  ३८२ पैकी ३८२ मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला.

अखेर बुधवारी झालेल्या मतमोजणीत पाटील हे सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. अखेर त्यांनी विजयाबर शिक्कामोर्तब केले. सतेज पाटील यांना एकुण २२० मते मिळाली तर महादेवराव महाडिक यांना १५२ मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *