बॉलिवूडचा दबंग खान रविवारी ५० वर्षाचा झाला. सलमान खानचा आज वाढदिवस असून त्यांच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा सलमान खान… ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून सलमानने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. ‘मैंने प्यार किया’ हा त्याच्या दुसरा पण सुपरहीट चित्रपट ठरला. या चित्रपटातून बॉलिवूडला एक नवा स्टार मिळाला.
सलमान स्वतःला २७ वर्षाचा समजतो. ‘मला वाढत्या वयाची भिती वाटत नाही, मी नेहमीच २७ वर्षांचा राहीन. वाढत वय हा आयुष्याचा एक भाग आहे’ असे सलमानने सांगितले.
सलमानची ब्रथडे पार्टी
सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी अनेक सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते. यावेळी सलमानचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. त्याने १२ वाजता केक कापला. सलमानच्या वाढदिवसाचा पहाटे पर्यंत जल्लोष सुरू होता.