काबूलमध्ये विमानतळाजवळ स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एका विमानतळावरील कारमध्ये बॉम्बस्फोट झालाय. हमिद करझाई या विमातळाजवळील एका कारमध्ये हा स्फोट झालाय.

या हल्ल्यात अनेक जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेय. अफगाणिस्तान सरकारने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

अफगाणिस्ताना याआधीही अशा प्रकारचे हल्ले झालेत. याच महिन्यात आठ डिसेंबरला अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर गोळीबार तसेच बॉम्बस्फोट झाला होता. तीन आत्मघाती तालिबान्यांनी हा हल्ला केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *