रेल्वे खिसा कापणार, तात्काळ तिकीट दरात वाढ

रेल्वे खिसा कापणार, तात्काळ तिकीट दरात वाढ

भारतीय रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापण्याची तयारी केली आहे. कारण रेल्वेच्या तात्काळ तिकीट दरात भरघो, वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आहे. उद्या म्हणजे 25 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होईल.
स्लिपरच्या तत्काळच्या तिकिटासाठी 175 रूपयांऐवजी 200 रु. द्यावे लागतील. तर स्लिपर तिकिटाचं कमीत कमी तात्काळ शुल्क 90 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आलं आहे. मात्र सेकंड क्लास तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवासांना यामधून सूट देण्यात आली आहे.

तात्काळ दरवाढ

 

स्लिपर

 

*किमान चार्जेस 90 वरून 100 रुपये. कमाल चार्जेस 175 वरुन 200 रुपये वाढवण्यात आले.

 

एसी चेअरकार

 

* किमान चार्जेस 100 वरुन 125, तर कमाल चार्जेस 200 वरून 225

 

एसी थ्री टायर

 

* किमान तात्काल चार्जेस 250 वरून 300 रुपये करण्यात आले. तर कमाल चार्जेस 350 वरुन 400 झाले आहेत.

एसी टू टायर

* किमान तात्काळ चार्जेस 300 वरून 400 , तर कमाल चार्ज 400 वरुन 500

एग्झिक्युटिव्ह क्लास

* किमान तात्काळ चार्जेस 300 वरुन 400, तर कमाल चार्ज 400 वरून 500 पर्यंत वाढवण्यात येईल.

 किमान आरक्षण दर

श्रेणी                जुने दर    नवे दर
सेकंड क्लास      10          10

स्लीपर क्लास    90         100

एसी चेअर         100         125

एसी थ्री टायर    250        300

एसी टू टायर      300       400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *