सलमान खान रिक्षातून गेला घरी

बॉलीवूडचा दबंग खान हा त्याचा भाऊ सोहेल खान याच्या वाढदिवशी चक्क रिक्षातून घरी जातांना दिसला. रविवारी रात्री सोहेल खान याच्या वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर तो घरी निघाला पण तो रिक्षातून घरी जाईल असं कधी कोणाला वाटलं नसेल.

सलमान हा बॉलीवूडचा डाऊन टू अर्थ अभिनेता मानला जातो. सलमान खानसोबत अभिनेता निखील दिवेदी हा रिक्षामधून प्रवास करताना दिसला.

सोहेल खानच्या वाढदिवशी संपूर्ण परिवार मुंबईच्या एका हॉटेलमध्ये जेवनासाठी गेले होते. त्यावेळेस सलमानने घरी रिक्षातून येण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *