मुंबईत 24 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुसार पहाटे पाचपर्यंत बार आणि रेस्टॉरंट मालकांना आपली दुकानं सुरु ठेवता येतील.
मात्र यावेळी तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी शहरातल्या शंभर ठिकाणांवर नाकेबंदीही केली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागानं यासंदर्भातलं परिपरत्रक जारी केलं आहे. तसंच या काळात बनावट मद्याचा पुरवठ्यांवरही उत्पादन शुल्क विभागाची नजर राहील, असं सांगण्यात आलं आहे.
दरवर्षाच्या वर्षअखेरीस बार आणि रेस्टॉरंटच्या वेळापत्रकावर मर्यादा घातल्या जातात. त्यानंतर बार संघटना कोर्टात जावून पहाटेपर्यंत बार सुरु ठेवण्याची परवानग्या मिळवतात. मात्र यंदा पहिल्यांदाच उत्पादन शुल्क विभागानं परिपत्रक काढून बार पहाटे पाचपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे.