ऑस्कर स्पर्धेत ‘हेमलकसा’ चित्रपट

ऑस्कर स्पर्धेत ‘हेमलकसा’ चित्रपट

डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘हेमलकसा’ या हिंदी चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली आहे. जगातून ३०० चित्रपट निवडले असून त्यात या चित्रपटाचा समावेश झाला.

मराठीतील ‘प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट हिंदीत ‘हेमलकसा’ या नावाने तयार केला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट चित्रपट आदी विभागात त्याला नामांकन मिळाले आहे.

समृद्धी पोरे दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘हेमलकसा’ ऑस्करच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे मराठी चित्रपट ‘कोर्ट’ हा ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी हा चित्रपट हिंदीत बनविण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे पुन्हा शुटींग करून डॉ. आमटे यांच्या जीवनावर आधारीत ‘हेमलकसा’ या नावाने हा हिंदी चित्रपट बनवला.

‘हेमलकसा’ या चित्रपटाची कथा – पटकथा – संवाद अॅड. समृद्धी पोरे यांनी लिहिली असून दिग्दर्शनाचीही जबाबदारी त्यांनी पेलली आहे. तसेच ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी ‘हेमलकसा’ या हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *