ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारताची संघनिवड शनिवारी

ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारताची संघनिवड शनिवारी

पुढील महिन्यात होणा-या ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय संघाची निवड शनिवारी (१९ डिसेंबर) नवी दिल्लीत केली जाणार आहे. राष्ट्रीय निवडसमिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडसमिती संघनिवड करेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) माहितगारांनी बुधवारी सांगितले.

१२ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यानच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात भारताचा संघ पाच वनडे आणि तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळेल. वनडे सामने पर्थ, ब्रिस्बेन, मेलबर्न, कॅनबेरा आणि सिडनी तसेच टी-२० सामने अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनीत होतील.

मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत मार खावा लागला तरी महेंद्रसिंग धोनीकडेच भारताची धुरा राहणार असल्याचे समजते. भारताचा संघ ६ जानेवारीला ऑस्ट्रेलियाला प्रयाण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *