येथे शुद्ध हवेसाठी वसूल केले जातात पैसे!

चीनमध्ये प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. त्याचे फटके नागरिकांना वेगवेगळ्या मार्गाने बसत आहेत. चीनमधील एका रेस्टॉरंटने तर ग्राहकांना शुद्ध हवा देण्यासाठी शुल्क लावले आहे.

जियांगसु प्रांतात झांगजिआगांग येथे एका रेस्टॉरंटमध्ये एअर फिल्टरेशन मशिन्स बसवल्या असून ग्राहकांकडून ती चालवण्याची किमत वसूल केली जाते. ग्राहकांनी जेवण केल्यावर जेव्हा त्यांना बिल दिले जाते. तेव्हाच त्यांना याची माहिती समजते.

प्रति ग्राहक एक युआन असा हा दर आहे. ग्राहकांनी याची तक्रार स्थानिक सरकारकडे केली असून सरकारने हॉटेल मालकास ही बेकायदा वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र सोशल मीडियावर या शुल्काचे मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले जात आहे. शुद्ध हवेसाठी आम्ही एक युआन देण्यास तयार आहोत, असे अनेकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *