बॉलिवूडच्या दबंग खानच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा सुरू असतात. मात्र, आता लवकरच या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. होय.. सलमान आता येत्या नवीन वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
बॉलिवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर सलमानच्या नावाची चर्चा याआधी ब-याचदा झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानचे रोमानियाची लूलिया वान्तूर हिच्याबरोबर प्रेम प्रकरण चालू असल्याचे बोले जात होते. सलमान तिच्या बरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चेला तर उधाण आले होते.
हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच लग्न करणार असल्याचे सलमानने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते. दोन दिवसा अगोदरच सलमानच्या या प्रकरणाचा निकाल लागला असून आता सलमान लग्न करणार असल्याचे बोले जात आहे.
आता येत्या २०१६मध्ये सलमान खान लग्नाच्या बेडित अडकणार की नाही, अडकला तर कोणाबरोबर तो लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.