आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश

इंडियन प्रीमियर लीगमध्ये  पुणे आणि राजकोट या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे संघाची मालकी संजीव गोयंका आणि राजकोट संघाची मालकी इंटेक्स मोबाईलकडे असणार आहे.

मंगळवारी दिल्लीत झालेल्या आयपीएलच्या गव्हर्नींग कौन्सिलच्या बैठकीनंतर या दोन नवीन संघाची घोषणा करण्यात आली.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघाच्या ऐवजी  पुणे आणि राजकोट संघ  खेळणार आहेत.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान आणि चेन्नई संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याने या दोन संघाना स्थान मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *