कांदिवली झोपडपट्टी दुर्घटना : शेकडो नागरिकांनी रात्र काढली उघड्यावर

कांदिवली झोपडपट्टी दुर्घटना : शेकडो नागरिकांनी रात्र काढली उघड्यावर

कांदिवलीत सोमवारी झोपड्या भस्मसात झाल्या. शेकडो नागरिकांना रात्र उघड्यावर काढावी लागली. स्थानिकांकडून पीडितांना कपडे आणि अन्नधान्याची मदत करण्यात येतेय. परिसरातील विलासराव देशमुख उद्यानात तात्पुरता कॅम्प बनवण्य़ात आलाय.

बेघर झालेल्या नागरिकांना तिथं मदत केली जातेय.  कांदिवलीत लागलेली आग ही गॅस सिलेंडरमधून वायूगळती होऊन लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्या दिशेनं तपासही सुरु आहे. तर दुसरीकडे पीडित स्थानिक मात्र वेगळीच शक्यता वर्तवत आहेत. आग लागलेली झोपडपट्टीची जागा मोठी आहे. या जागेवर डोळा ठेवूनच मुद्दामहून ही आग लावली गेल्याचा आरोप, स्थानिकांनी केला आहे.

कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरात असलेल्या दामूनगरमध्ये घरगुती  सिलिंडरच्या स्फोटात सपूर्ण परिसर जळून खाक झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. भर दुपारच्या या अग्नितांडवात दोघांचा मृत्यू झाला असून १३  जण जखमी झाले. प्रल्हाद खरात (४५) असे यातील एका मृताचे नाव आहे. दुसऱ्याचे नाव समजू शकलेले नाही.

अग्निशमन दलाच्या १६ गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरातील घरांना लागलेली आग विझविण्यात आले या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कांदिवली पूर्व परिसरातील दामूनगर येथील सुमारे १००० झोपड्यांना आग लागली. एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौंद्ररूप धारण करत शेजारील घरांनाही आपल्या भक्ष्यस्थानी घेतले आणि यात तब्बल ५० सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचे तांडण झाले.

आगीतील जखमी
पार्वती शंकर नानूबा (६०), सुमित्रा भानूदास रक्षा (३०), रमा सुनील कांबळे (५४), सोनू गुप्ता (२४), नझिर शेख (३५), आशा उंगळे (२६), ज्याकी कागडा (२५), वैशाली मस्के (२८), सुरेश तेडीगीनकरी (३१, सुरेंद्र किसन पोले (२२), सैना राजेश सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *