सीएसटी स्थानकात बफरला धडकून लोकलचे २ डबे घसरले

सीएसटी स्थानकात बफरला धडकून लोकलचे २ डबे घसरले

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील बफरला धडकून लोकलचे दोन डबे रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास लोकल शंटिंगच्यावेळीस हा अपघात घडला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रात्रीची वेळ असल्यामुळे स्थानकावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या अपघातात लोकल व प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त लोकल रुळांवरून हटवण्यात आली असून लोकलसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सीएसटीहून सुटणा-या काही लोकल उशीराने धावत आहेत.

या अपघातामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चगेट स्थानकावर लोकल बफरला धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या अपघातात मोटरमनसह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *