कांदिवलीतील भीषण आगीत २ ठार

कांदिवलीतील भीषण आगीत २ ठार

कांदिवलीतील दामू नगर झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी लागलेल्या या आगीत ४० -५० सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट झाल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

समता नगर परिसरात असलेल्या दामू नगर झोपडपट्टीतील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली. दाट लोकवस्तीच्या या झोपडपट्टीत लागलेल्या आगीमुळे इतर घरांमधील सिलेंडरचेही एकामागोमाग स्फोट झाले व त्यामुळे आग आणखीनच भडकली.

दरम्यान आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्यांनी घटनास्थली धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *