बेडरुममधील अनेक गोष्टी छुपा कॅमेऱ्यात कैद, शेजाऱ्याचा कारनामा उघड

पती-पत्नीच्या बेडरुममधील खासगी गोष्टी छुप्या कॅमेऱ्यांने कैद केल्या. हा सर्व प्रकार शेजारी राहणाऱ्या युवकांनीच केल्याचे पुढे आलेय. त्यांनी चोरून पती-पत्नीच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवला. त्यानंतर बेडरुममध्ये ज्या काही खासगी गोष्टी चालयच्या त्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडित पती-पत्नी बेडरुममध्ये आरामात झोपले होते. त्यावेळी त्यांचे लक्ष खिडकीकडे गेले. खिडकीची तुडलेल्या जाळीत छुपा कॅमेरा बसवला होता. त्याच्यामाध्यमातून शेजारी राहणाऱ्या तिघांनी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर अपलोड करण्यात आला. त्यावेळी तो शेजारी राहणाऱ्या काकांना मिळाला. त्यानंतर ही माहिती पीडीत जोडप्याला समजली. त्यांना जोरदार धक्का बसला.

ही घटना इंदोरमधील राजेंद्र नगर परिसरात घडली. शेजारी राहणारे कन्हैयालाल सुरारे यांनी चोरुन हा व्हिडियो बनविला होता. त्यानंतर त्याने तो व्हाट्सअॅपवर टाकला. त्यानंतर त्याचे मित्र विजय कराडे आणि गणेश पल्ले यांनी तो व्हिडिओ दुसऱ्या ग्रुपवर पाठवून दिला. त्यानंतर बेडरुममधील हा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी सांगितले, बेडरुममधील व्हीडिओ करण्यासाठी अनेक दिवसांपासून कन्हैयालालचा प्रयत्न होता. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलाय. त्याच्याकडे अनेक क्लिप होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *