अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; भोजन व्यवस्थेवर नाराजी

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील भोजन व्यवस्थेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. रुग्णांना करपलेल्या चपात्या, बेचव वरण आणि पातळ भाजी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रुग्णांचा आजार, उपचारपद्धती आणि आहाराच्या गरजा वेगवेगळ्या असताना सर्व रुग्णांना सरसकट एकसारखे भोजन दिले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

आजारानुसार आहार देणे आवश्यक

मधुमेह, किडनीविकार, हृदयरोग तसेच इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्यांच्या आजारानुसार आहार देणे आवश्यक असते. काही रुग्णांना कमी मीठ, काहींना कमी साखर, तर काहींना द्रवपदार्थांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत सर्वांना एकच आहार दिल्यास रुग्णांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालयात आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार भोजन दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *