मुंबईत आजही काहिली? तर पुण्यात हिवाळ्याची चाहूल, यंदा ‘एल निनो’ची तीव्रता अधिक; हवामान विभागाचा मोठा अंदाज

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढायला सुरुवात झाली असून, शुक्रवारीही मुंबईसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे ३७.२ तर कुलाबा येथे ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची गुरुवारी नोंद झाली. कुलाबा येथील कमाल तापमान तब्बल ४ अंशांनी तर सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३.२ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होते.

तापमानात दिलासा नाहीच

सध्या ईशान्य ते पूर्व पट्ट्यातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान चढे असून सुमद्रावरून येणारे वारे उशिराने वाहत असल्याने तापमान दिलासा मिळत नसल्याचे दिसते. मुंबईमध्ये गुरुवारीही उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आर्द्रतेमध्ये किंचित घट झाल्याने उकाड्याची तीव्रता कमी होती. शुक्रवारी आभाळ निरभ्र असेल अशी शक्यता आहे. त्यामुळे चटक्यांची तीव्रता वाढू शकते. शनिवारी २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीतही ३६ ते ३७ अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले जाऊ शकते, असा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, गुरुवारी यासंदर्भात पुढील दिवसांसाठी कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांनाही शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरणासाठी इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *