नांदेडमध्ये लग्नमंडपाला आग, वऱ्हाड्यांची धावपळ; समोर आलं धक्कादायक कारण

महाराष्ट्रातील शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा उत्साह दिसून येत आहे. एकीकडे हवामानातील बदलांमुळे तारंबळ उडत असतानाच दुसरीकडे लग्नाची जोरदार तयारी करुन धुमधडाक्यात लग्नं लावली जात आहेत. लग्न म्हटल्यानंतर गडबड गोंधळ हा ओघाने आलाच. कधी वस्तू न सापडणे तर कधी वेळापत्रक कोलमडण्यासारख्या बाबी तर लग्नात सामान्य गोष्टी आहेत. थोडी तडजोड करतच लग्नाचा दिवस वऱ्हाड्यांना ढकलावा लागतो असं म्हटलं जातं. मात्र नांदेडमध्ये एका लग्न सोहळ्यात अगदीच विचित्र घटना घडली असून प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे.

नेमका कुठे घडला हा प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, कंधार तालुक्यामध्ये लग्नमंडपाला आग लागल्याची घटना घडली आहे. येथील निपाणी सावरगावमध्ये एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला. लग्न सोहळ्यानिमित्ताने करण्यात आलेल्या आतिषबाजीदरम्यान ही दुर्घटना घडली. आतिषबाजीदरम्यान एक जळता फटाका उडून लग्नमंडपाला अचानक आग लागली. लग्नमंडपाला आग लागल्याने वऱ्हाड्यांची एकच धावपळ झाली. ताटे कुंटुंबाच्या या लग्नसोहळ्यामध्ये एकाच मंडपात एकूण तीन लग्नं लागणार होती. त्यामुळे लग्नमंडपात मोठ्या प्रमाणात वऱ्हाड्यांची हजेरी लावलेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *