राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी.च्या कामगार संघटनेचं 57 वं राज्यव्यापी अधिवेशन सोमवारी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये पार पडलं. या अधिवेशनाला सरकारच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत या अधिवेशनात विचार विनिमय झाला. शासनाने मागण्यांची दखल घेतली नाहीतर संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे या अधिवेशनाकडे विशेष लक्ष लागून होतं.
व्यासपीठावर उपस्थित मंत्री एसटी कामगारांना काय आश्वासन देतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. महिला कर्मचाऱ्यांना रात्री आठनंतर ड्युटी करावी लागणार नाही असं नियोजन करण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी दिले. मात्र या अधिवेशनामध्ये मंत्री भरत गोगावलेंनी भाषणादरम्यान दिलेला एक विचित्र सल्ला चर्चेत आहे.
