दहावी- बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार, शिक्षण मंडळाची माहिती

राज्यात सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा संपून आता वेळ झाला आहे. दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालक सुट्ट्यांचे नियोजन करु लागलेयत. दरम्यान परीक्षांनंतर आता मुलांचे निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दरम्यान दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

महत्त्वाची अपडेट 

बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू  झाली होती. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल मे मध्येच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.

21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत.  मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *