माझी बायको तीसरी, राहुल आधीपण…” सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट

लग्नाच्या नऊ दिवस आधी अलिगडमधून पळून गेलेल्या सासू आणि जावयाचा ठाव ठिकाणा पोलिसांनी शोधून काढला आहे. दोघेही बिहारमध्ये लपून बसले आहेत. पोलिसांचे पथक त्यांना शोधण्यासाठी बिहारला रवाना झाले आहे. ही माहिती फरार महिलेचा पती जितेंद्रने स्वतः दिली. तो म्हणाला की, “दोघेही बिहारमध्ये लपले आहेत. पोलीस लवकरच त्यांना अटक करतील. राहुलचे गावकरीही आम्हाला बरीच माहिती देत आहेत.” राहुल यापूर्वीही दोन महिलांसोबत पळून गेला असल्याचे त्याच्या गावातील लोकांनी आम्हाला सांगितले असल्याचेही जितेंद्रने म्हटले.

जितेंद्रच्या मते, राहुलने असे करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी तो एका मुलीसोबत पळून गेला होता. पण काही दिवसांनी परत आला होता. दुसऱ्यांदा तो त्याच्या गावातीलच दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. तेव्हाही तो परत आला. यावेळी तो माझ्या पत्नीसोबत पळून गेला. त्याचे चारित्र्य आधीपासूनच चांगले नव्हते. राहुलच्या गावातील लोक स्वतः मला फोन करून त्याच्या दुष्कृत्यांबद्दल सांगत आहेत. असे जितेंद्र म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *