प्रवासी बोटीला छिद्र पडलं अन् 130 जण बुडणार इतक्यात…; अलिबागजवळ समुद्रातील थरार

पर्यटकांची गर्दी असणाऱ्या आणि आठवडी सुट्टी, लाँग विकेंडला धरून या गर्दीला सातत्यानं आकर्षित करणाऱ्या अलिबागजवळील समुद्रात एक भयंकर घटना घडली. समयसूचकतेमुळ इथं मोठा अनर्थ टळला. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या अलिबागनजीक मांडवा जेट्टी इथं ही दुर्घटना घडल्याचं वृत्त समोर आलं. एका प्रवासी बोटीला छिद्र पडल्यानं अचानकच बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

प्राथमिक माहितीनुसार या घटनेवेळी बोटीवर 130 प्रवासी होते. वेळी महतत्वाच्या गोष्टी लक्षात येताच तातडीनं प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचवला गेला. सायंकाळी साधारण साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. मांडवा सागरी पोलिसांनीसुद्धा सदरील घटनेच्या वृत्तास दुजोरा दिला. बोटीमध्ये पाणी शिरत असल्याचं कळतात ही बातमी वायुवेगानं तिथं पसरली आणि प्रवाशांमध्ये भीतीनं एकच गोंधळ माजला. पण, बोटी पाणी शिरण्यास सुरुवात होताच तातडीनं एक मोठं संकट थोपवून धरण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आणि या बोटीतील सर्वांनाच सुरक्षित स्थळी उतरवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *