…आणि त्यांनी अथांग समुद्राकडे वाटचाल केली

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम सध्या सुरू असून, कोकणातील काही समुद्रकिनाऱ्यांवर कासव महोत्सव भरविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे – आडबंदर येथे पहिल्यांदाच कासव महोत्सव भरविण्यात आला होता. या महोत्सवादरम्यान १०० हून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या कासवांचा वावर आढळतो. त्यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या सागरी कासवांच्या प्रजातींचा समावेश आहे. प्रामुख्याने ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजाती कोकण किनारपट्टीवर आढळतात, रत्नागिरी जिल्ह्यांतील १७, तर, रायगड जिल्हयात ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम राबवण्यात येत आहे. मुणगे -आडबंदर येथे प्रथमच ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. वनविभाग, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने हा कासव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात १५० कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्याने यापुढे ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्याचा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *