देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काश्मीर आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये पर्वतीय भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळतेय, तर हिमाचल आणि तत्सम क्षेत्रातही थंडीची चादर पाहायला मिळत आहे.
उत्तरेकडे सक्रिय झालेल्या याच थंडीचे परिणाम महाराष्ट्पापर्यंत दिसू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रापुरता सीमीत असणारी थंडी आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र मात्र यास अपवाद ठरत असून, इथं पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, सातारा आणि कोल्हापूरातील काही भागांमध्ये हवामान विभागानं मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे.