शरीरावर होणारा करोनाचा प्रतिहल्ला रोखण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात काम करत होती. यावेळी बऱ्याच व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही करोनाच्या विषाणूंऐवजी मज्जातंतूवर आघात करू लागली. त्यामुळे करोनानंतर या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. – डॉ. राहुल चकोर, न्यूरोलॉजी विभागप्रमुख.

रोगप्रतिकारशक्तीच्या आघाताची कारणे

-मेंदूज्वर झाल्यास मज्जातंतू प्रणालीवर परिणाम करतात.

-पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाल्यास

-मज्जातंतूला संसर्ग झाल्यास

-आहार पद्धत, पचनसंस्था, रोगप्रतिकार शक्ती आणि मज्जातंतू यामध्ये परस्पर संबंध आहे. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आहार पद्धतीमध्ये झालेला बदलही यासाठी कारणीभूत असण्याची शक्यता