आटपाडीमध्ये डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपयांचा सर्वोच्च दर

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात बुधवारी दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला. पंढरीनाथ नागणे यांच्या ‘मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स’मध्ये नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला हा भाव मिळाला. श्रावण महिन्यास प्रारंभ झाल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. किमान ८० ते कमाल २०० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. सध्या बाजार समितीच्या सौदे बाजारात दररोज सरासरी ३ ते ४ हजार क्रेटची आवक होते. त्यांपैकी निम्मी आवक मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये होते.

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला दर्जानुसार प्रतिकिलो ५४, ८६, ११३, १४० व ५५१ पर्यंत प्रतिकिलो असा दर मिळाला. पिलीव येथील जहांगीर शमसुद्दीन मुलाणी यांच्या मालाला ६८, ९९, १४६, २०० व २६४, माळशिरस येथील चांगदेव वाघमोडे यांच्या मालाला ५७, ८६, १०४, १३६ व १७१ आणि श्रीगोंदा अहिल्यानगर येथील बंडू दत्तू लकडे यांच्या डाळिंबाला ४०, ७४, ९६, १२२ व १४१ रुपये असा दर मिळाला. दर्जेदार लाल रंगाच्या डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *