सोसायटीतील मीटिंग मधील वाद; अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला

सोसाटीतील सदस्य आणि त्याच्यातील वाद काही नवा नाही. अनेकदा सोसायटीतील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुंबईत एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे.  सोसायटीतील मीटिंग मधील वाद सभासदाला चांगलाच महागात पडला आहे. सोसायटीच्या अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत दरम्यान झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाला आहे.  सोसायटीच्या मीटिंग दरम्यान झालेल्या वादात एका सभासदाला आपला अंगठाच गमवावा लागला आहे.

अध्यक्षा सोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे अंगठा हातापासून वेगळा झाला आहे. हा गंभीर प्रकार दहिसर पश्चिमेकडील मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंट मध्ये घडला आहे. सोसायटीचे सदस्य असलेल्या आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला या वादात आदित्य देसाई यांचा अंगठा अध्यक्ष नित्यानंद परिवार यांनी चावून हातापासून वेगळा केला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिकच्या तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *