वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीचा कराड लगतच्या मलकापूर येथे इमारतीवरून ढकलून देवून खून करण्यात आला आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले असून संबंधित प्रियकरास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते.
आरूषी सिंग (वय २१, रा. झुरण छपरा रोड नंबर ३, मुजफ्फरनगर एमआयटी मुजफ्फरनगर राज्य- बिहार) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर ध्रुव राजेशकुमार छिक्कारा (वय २१, रा. घर नंबर ६८४, गल्ली नंबर १, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत राज्य- हरियाणा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिप्ती सिंग (वय ४८, रा. झुरण छपरा रोड नंबर ३, मुजफ्फरनगर एमआयटी मुजफ्फरनगर राज्य- बिहार) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
