ठाकरे गटाकडून निवडणुक लढवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशलिस्टची पत्नी शिंदे गटात

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. ठाकरे गटाकडून निवडणुक लढवणारे एन्काऊंटर स्पेशलिस्ट  प्रदीप शर्मा यांच्या पत्नीने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.  प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात ते मैदानात उतरले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान एँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनाण्यात आली होती.

प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा  दिलासा मिळालाय. कोर्टानं लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना अंतरिम जामीन मंजूर केलाय. मुंबई हायकोर्टानं शर्मांना जामीन नाकारला होता. याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *