राज्यात १५ दिवसांत सापडले झिकाचे २० रुग्ण, ‘अशी’ घ्या काळजी

राज्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असताना झिकाच्या रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. जुलैच्या १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या २८ झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत.

राज्यात जाानेवारीपासून आतापर्यंत झिकाचे २८ रुग्ण सापडले आहेत. त्यातील मे महिन्यात दोन रुग्ण तर जूनमध्ये ६ रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले आहेत. मे महिन्यात कोल्हापूर व संगमनेरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. मात्र जूनमध्ये पुण्यात सहा रुग्ण सापडले आहेत. जुलैत झिकाचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात सापडले. आतापर्यंत सापडलेल्या २८ रुग्णांपैकी २४ रुग्ण हे पुणे शहरात सापडले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि मुळशी तालुक्यात प्रत्येकी एक असे दोन रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरात सापडलेल्या २४ रुग्णांमध्ये १० गर्भवती महिलांना झिकाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *