इसिस (ISIS) ही धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणारी ही संघटना आहे . याच दहशतवादी संघटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं जाळं पसरवलंय. छत्रपती संभाजीनगरमधले 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. इसिसच्या संपर्कात आलेल्या या तरुणांना स्फोटकं तयार करणं. घातपात कसा घडवायचा आणि त्यानंतर कसं पळून जायचं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जात होतं. तरुणांचं ब्रेनवॉश करण्यासाठी व्हिडिओ दाखवले जात असल्याचंही समोर आलंय. एनआयएच्या आरोपपत्रातूनच हा मोठा उलगडा झालाय.
50 तरुण ISISच्या जाळ्यात?
संभाजीनगरातील 50 तरुण ISISच्या जाळ्यात असल्याची धक्कादायक माहिती मोहंमद जोएबच्या चौकशीत समोर आली आहे. जगभरात ISISचं जाळं पसरवण्याचा मोहंमद जोएबचा प्लान होता. यासाठी जोएबनं संभाजीनगरात एक व्हॉट्सअप ग्रूप बनवला होता. ग्रूपमध्ये 50 पेक्षा जास्त जणांचा समावेश करण्यात आलं होतं. त्यांना शपथ देऊन भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा जोएबचा मानस होता. व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ शेअर केले जायचे. भारतात कुठे, कसे दहशतवादी हल्ले करायचे याचा प्लॅनही ठरला होता. हल्ले झाल्यानंतर अफगानिस्तान, तुर्कीत पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.
