भूकंपाने ओसाड पडलेल्या गावठाणाला आलेले स्मशानाचे स्वरूप अन् दुर्लक्षित झालेल्या भागात काहीतरी भयंकर घडत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औश्यातील लामजना गावातील ओसाड जुन्या गावठाणात शंकास्पद घटना निदर्शनास आल्या. गुप्तधनासाठी खड्डे पाडल्याचा संशय निर्माण होत आहे. हा गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा तर प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया. 1993 च्या प्रलयंकारी भूकंपात किल्लारीसह परिसरातील जमिनीखाली गाढल्या गेलेल्या गावांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी ओसाड गावठानातील ढिगाऱ्याखाली गुप्तधन आहे अशी अंधश्रध्दा आजही लोक बाळगून आहेत. याच अंधश्रद्धेतून या परिसरात रात्री अपरात्री खोदकाम सुरु असते. लोक गुप्तधनाच्या अंधश्रद्धेतून खोदकाम करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

भूकंपाने ओसाड पडलेल्या गावठाणाला आलेले स्मशानाचे स्वरूप अन् दुर्लक्षित झालेल्या भागात काहीतरी भयंकर घडत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औश्यातील लामजना गावातील ओसाड जुन्या गावठाणात शंकास्पद घटना निदर्शनास आल्या.  गुप्तधनासाठी खड्डे पाडल्याचा संशय निर्माण होत आहे. हा गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा तर प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया.

1993 च्या प्रलयंकारी भूकंपात किल्लारीसह परिसरातील जमिनीखाली गाढल्या गेलेल्या गावांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी ओसाड गावठानातील  ढिगाऱ्याखाली गुप्तधन आहे अशी अंधश्रध्दा आजही लोक बाळगून आहेत. याच अंधश्रद्धेतून या परिसरात रात्री अपरात्री खोदकाम सुरु असते. लोक गुप्तधनाच्या अंधश्रद्धेतून खोदकाम करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *